ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ पहिला ठराव मंजूर
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांमधून एकमत
पंढरपूर/प्रतिनीधी
सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये चालू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात वेगवेगळे मतप्रवाह सुरू आहेत. याबाबत अनेक ठिकाणी विरोध दर्शवित तक्रारी सुरू आहेत. मात्र पंढरपूर शहरालगत असलेल्या मी टाकळी ग्रामपंचायत सदस्यांकडून मात्र बैठकीत समर्थनार्थ एकमत झाल्याचे दिसून आले असून. याबाबतचाठराव मंजूर करुन घेण्यात आलेली राज्यातील पहिली ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी ठरली आहे.
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्याच्या बैठकीत ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ आज गुरुवारी एकमुखाने ठराव करून घेतला आहे. या ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता असून या ठिकाणी शिंदे गटाचे सरपंच संजय साठे व भाजपचे उपसरपंच संदीप भैय्या सोनवणे अशी महायुतीची सत्ता आहे . सध्या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात चालू असलेले तक्रारी संदर्भात राज्यामध्ये प्रथमच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने ईव्हीएम मशीनच्या संदर्भात राज्यामध्ये पहिला ठराव एकमताने मंजूर केला आहे.
यावेळी झालेल्या बैठकीसाठी सरपंच संजय साठे, ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे, नंदकुमार वाघमारे ,नागरबाई साठे, आशाबाई देवकते, रेश्मा साठे, रोहिणी साठे, माजी उपसरपंच महादेव पवार, माजी सरपंच विजयमाला वाळके, समाधान देटे, सुरेखा खपाले ,शितल कांबळे, रुक्मिणी जाधव, गोवर्धन देठे, यांचेसह सर्व गावातील इतर नागरिक व ग्रामसेवक जयंत कुमार खंडागळे व कर्मचारी उपस्थित होते.