पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष प्रा सुभाष वायदंडे यांना पीएचडी.
दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. बिपिन खुराना यांच्या हस्ते प्रदान
पंढरपूर – पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा सुभाष वायदंडे यांना जर्मनीच्या हेसेन या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाकडून सामाजिक कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील फाईव्ह स्टार हॉटेल रेडिसन ब्ल्यू मध्ये आयोजित दीक्षांत समारंभात कुलगुरू डॉ. बिपिन खुराना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
यावेळी भाजपाच्या माजी खासदार डॉ. शैला खान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा दिल्ली बार कौन्सिलचे अध्यक्ष एडवोकेट अजय सोंधी, माझी कुलगुरू एडवोकेट नेहा चौधरी, दिल्लीचे रजिस्टर रवींद्र कुमार पाहूजा प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना डॉ.सुभाष वायदंडे म्हणाले की सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना गेली वीस वर्षे समाजाभिमुख चळवळ चालवली असून पुरोगामी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अकरा जिल्हे व कर्नाटकातील तीन जिल्ह्यांमध्ये अन्यायाच्या विरोधात तीव्र लढा उभा करून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचं काम केले असून पुरोगामी संघर्ष परिषदेमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी निर्माण केली आहे.
सदर दीक्षांत समारंभासाठी रतन सिंग, राजेश पाटीदार, आचार्य प्रदीप टॅक्सक, राजेश अग्रवाल, मनोज कुशवाह,राजकुमार बन्सल, कार्तिक जैन, एडवोकेट श्वेता भारद्वाज डॉ. मृत्युंजय शुक्ला गुंजन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.