पंढरीत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे वाटप
महाप्रसाद कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार भेट
पंढरपूर/प्रतिनिधी _आषाढी वारी निमित्त राज्यभरातील भाविक शेकडो मैल संतांच्या पालखी सोबत पायी चालत पंढरपुरात दाखल होत असतात.
या आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथील सरगम चौक, एचडीएफसी बँकेसमोर सलग तीन दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेत आहेत. आषाढी एकादशी दिवशी सदर महाप्रसाद वाटप केंद्रास राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट द्यावी याबाबत त्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या महाप्रसादाचे आयोजन शिवाजी भोसले, युवराज क्षीरसागर, सौ. मीनाक्षीताई करंडे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
चौकट-
महाप्रसाद कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देणार भेट
आषाढी वारी निमित्त पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन पंढरपूर येथे करण्यात आले आहे. या महाप्रसाद कार्यक्रमास भेट देण्याची विनंती आयोजकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केल्याने आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री या महाप्रसाद कार्यक्रमास भेट देणार आहेत.