पुरोगामी संघर्ष परिषदेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी विक्रम चव्हाण
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे निवडीचे पत्र देण्यात आले
सोलापूर – पुरोगामी संघर्ष परिषदेच्या जळगाव जिल्ह्याच्या वरिष्ठ जिल्हाध्यक्षपदी विक्रम छगन चव्हाण (मु.पो.ता.धरणगाव पारधीवाडा) यांची फेर निवड करण्यात आली असून, चोपडा येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेच्या जळगाव जिल्ह्याच्या बैठकीत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ. प्रा. सुभाष वायदंडे यांच्या सहीचे निवडीचे पत्र उत्तर महाराष्ट्र वरिष्ठ अध्यक्ष अध्यक्ष धर्मा (दादा) (भिल) सोनवणे यांनी त्यांना वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष अनिल (बापू )पानपाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले.
सदर बैठकीस जळगाव युवक जिल्हाध्यक्ष सागर पवार,जळगाव जिल्हा कार्यकारणी सदस्य नारायण दादा पान पाटील,जामनेर तालुकाध्यक्ष हिरामण भिल,चोपडा तालुका अध्यक्ष खुशाल भिल,चोपडा शहराध्यक्ष राकेश भिल,चोपडा तालुका संपर्कप्रमुख धम्मदूत शिंदे,धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र साळुंखे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिलीप सोनवणे इत्यादी उत्तर महाराष्ट्रातील पुरोगामी संघर्ष परिषदेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शेवटी आभार धर्मदूत शिंदे यांनी मानले.