“या” तारखेला सोलापूरात राहुल गांधींची प्रणिती शिंदेसाठी सभा …..

सोलापूर : काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची २४ एप्रिल रोजी सोलापूर शहरात सभा होणार आहे. राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर लातूर विमानतळावरून शहरात सभेच्या ठिकाणी दाखल होईल, असे पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी नुकतेच माजी मंत्री सतेज पाटील आणि अमित देशमुख यांच्या जाहीर सभा झाल्या. आता राहुल गांधी यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे.
शहरात मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर बुधवारी दुपारी तीन वाजता राहुल गांधी यांची जाहीर सभा होईल.
महाआघाडीचे माढा, सोलापूर मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहतील. काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर ही सभा यशस्वी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांच्या सभा येत्या काळात होणार असल्याचे पवार यांनी सांगितले.